जत : अंगणवाडी सेविका व आशा व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने करजगी अत्याचार प्रकरणी मुक मोर्चा काढण्यात आला.मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जत येथील पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
जत तालुक्यातील करजगी येथे दि 6 फेब्रुवारीला 4 वर्षाच्या बालिकेवर पांडुरंग कळ्ळी या नराधमांने अत्याचार करून तिचा निघृणपणे खून केला आहे.माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा अंगणवाडी सेविका व आशा व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने निषेध करण्यात आला.
या आरोपीवर याअगोदर ही विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल आहे.हा खटला जलद गतीने न्यायालयात चालविण्यात यावा.त्या नराधमांला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी व पिडितेच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी या मोर्चा तून करण्यात आली.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी अंगणवाडी संघटनेच्या नेत्या कॉ.नादिरा नदाफ, आशा गटप्रवर्तक संघटनेच्या कॉ.मिना कोळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जत तालुका सेक्रेटरी कॉ.हणमंत कोळी,प्रकल्प अधिकारी शकुंतला निकम,सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, वंचितचे संजय कांबळे,युवा नेते संतोष मोटे,भुपेंद्र कांबळे,प्रशांत नाईक, समीर नदाफ, निलेश पवार,शैला पाटील,अंजुम नदाफ, योजना पुजारी, वैशाली पवार,मधुरा कांबळे, प्रमिला साबळे,शोभा पोतदार, सारिका यादव अश्विनी जगताप, शिंदे मॅडम,आदी उपस्थित होते.
जत येथे अंगणवाडी सेविका व आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.