शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभमिळवून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आयडी असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आयडी काढून घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले.
शासकीय योजनांचा लाभघेण्यासाठी फार्मर आयडी गरजेची आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपले सरकार सेवा केंद्र येथून फार्मर आयडी तयार करावी. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास सुलभजाईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करावी.
ही कागदपत्रे आवश्यक…
आधार कार्ड मोबाईल (मोबाईल क्रमांक आधार कार्ड लिंक असावा.) मोबाईल क्रमांक हा बँक खात्याशी लिंक असावा. सात-बारा नमुना आठ अ आदी कागदपत्रे यासाठी आवश्यक असणार आहेत.
सात-बारा आधार लिंक करा सर्व शेतकऱ्यांना ग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सात-बारा आधार लिंक करायचा आहे. लिंक झाल्यानंतर एक फार्मर आयडी तयार होईल. त्यानंतर पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान व विविध पीक अनुदान योजनेचा लाभ मिळणे सोयीचे होणार आहे. ज्यांच्याजवळ फार्मर आयडी राहणारनाही, त्यांना या विविध योजनेचा लाभ मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे.
अँग्रीस्टॅक योजना कशासाठी…
शेतकऱ्यांच्या शेतांचा, आधार संलग्न माहिती संच, शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच तसेच शेताचा भूसंदर्भीकृत यांचा माहिती संच एकत्रितरीत्या तयार करणे व सातत्याने अपडेट करणे, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे यासह अन्य बाबींसाठी या अँग्रीस्टॅकचा उपयोग होणार आहे.