सांगली : डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरणे आवश्यक आहे. इंटरनेट वापरताना सतर्क व जागरूक राहिल्यास इंटरनेटवरील फसवणूक आपण टाळू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल, पोलीस हवालदार किरण परदेशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, इंटरनेटवरील फसवणूक टाळण्यासाठी सायबर गुन्हे आणि हॅकिंग यासारख्या धोक्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढवावी.
इंटरनेटचा जबाबदारीने वापर करावा. नवनवीन तंत्रज्ञानाचा सकारात्मक पध्दतीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल यांनी सुरक्षित इंटरनेट दिनाविषयी सविस्तर माहिती दिली. पोलीस हवालदार किरण परदेशी यांनी इंटरनेट सुरक्षिततेबाबत माहिती दिली.
00000