कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याने संबंधित मुलगी गर्भवती राहिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग मारुती शेंबडे (वय २६, रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित पांडुरंग याने पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले व त गर्भवती राहिली त्यानंतर पीडित मुलीने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध फिर्याद नोंदवली आहे. याप्रकरणी संशयितावर फसवणूक लैंगिक अत्याचार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे रविवार, दि. ९ फेब्रुवारीरोज संशयितास अटक करण्यात आली. अधिक तपास कवठेमहांकाळ पोलिस करत आहेत.