दुबईच्या राजकुमाराच्या नावाने कुवेती गायकाचा वंदे मातरम गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

0
5

नवी दिल्ली . सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती अरबी पोशाखात दिसत आहे. त्याच वेळी, या व्यक्तीला एका सभागृहामध्ये वंदे मातरम् गाताना देखील ऐकले जाऊ शकते. एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करणारा हा व्हिडिओ शेअर करून, वापरकर्ते असा दावा करत आहेत की, हा वंदे मातरम् गात असलेल्या दुबईच्या राजकुमाराचा व्हिडिओ आहे.

विश्वास न्यूजने केलेल्या त्यांच्या तपासात असे आढळून आले की, या व्हायरल व्हिडिओमध्ये दुबईच्या राजकुमाराच्या संबंधित केलेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ कुवेतमधील त्या वेळेचा आहे, जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी डिसेंबर 202424 मध्ये कुवेतला भेट दिली होती. या व्हिडिओमध्ये कुवेती गायक मुबारक अल-रशीद आहेत. रशीद यांनी ‘हाला मोदी’ कार्यक्रमात ‘सारे जहाँ से अच्छा’ आणि ‘वंदे मातरम’ गायले होते. 

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

इंस्टाग्राम वापरकर्त्याने ही व्हायरल पोस्ट शेअर केली होती, जिच्यामध्ये ‘दुबई राजकुमार’ सोबत लिहिले होते की, “फक्त भारतातच वंदे मातरम् म्हणण्यात अडचण आहे, नाहीतर यांचे वडील किती आनंदाने ते म्हणत आहेत पहा.” जर तुम्ही कट्टर हिंदू असाल तर, या पेजला नक्की शेअर करा आणि फॉलो करा. जय श्री राम.  

तपास

आमचा तपास सुरू करून, सर्वप्रथम आम्ही व्हायरल व्हिडिओ बारकाईने बघितला. या व्हिडिओत ‘हाला मोदी‘ इंग्रजी आणि अरबी भाषेत लिहिलेले दिसत आहे. तिथेच पंतप्रधान मोदींचा एक फोटोही लावण्यात आला आहे. याच आधारावर आमचा तपास पुढे नेत आम्ही व्हिडिओचे कीफ्रेम काढले आणि गुगल लेन्सद्वारे कीवर्डच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. शोध घेत असताना हा व्हिडिओ आम्हाला फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आल्याचे आढळले. येथे व्हिडिओसोबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे कुवेतचे गायक मुबारक अलर-शीद आहेत. 

आम्हाला 25 डिसेंबर 2024 रोजीच्या हैदराबाद 24X7 न्यूज नावाच्या फेसबुक पेजवर देखील अपलोड केलेला व्हिडिओ आढळला. व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, हे कुवेती गायक मुबारक अल-रशीद आहेत, ज्यांनी ‘हाला मोदी’ मध्ये ‘सारे जहाँ से अच्छा’ आणि ‘वंदे मातरम’ गायले होते.

जेव्हा आम्ही मुबारक अल-रशीद विषयी शोध घेतला तेव्हा आम्हाला त्याच नावाचे इंस्टाग्राम हँडल सापडले. या हँडलवर व्हायरल झालेल्या व्हिडिओची एक आवृत्ती अपलोड करण्यात आलेली आढळली. त्याचवेळी, या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या देशाचे कुवेतचे प्रतिनिधित्व केल्याने आणि पंतप्रधानांच्या कुवेत दौऱ्याचा भाग झाल्याने मला खूप आनंद झाला आहे.

जेव्हा या बातमीचा शोध घेण्यात आला तेव्हा आम्हाला अमर उजालाच्या वेबसाइटवर याच्याशी संबंधित बातमी आढळली. 25 डिसेंबर 2025 च्या बातमीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवेतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ते कुवेतमधील शेख साद अल अब्दुल्लाह इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये ‘हाला मोदी’ या सामुदायिक कार्यक्रमात सहभागी झाला होते, जिथे एका कुवेती गायकाने देशभक्तीपर भारतीय गाणी सादर केली होती. 

यासंबंधीचा व्हिडिओ 21 डिसेंबर 2024 रोजी एएनआयच्या एक्स हँडलवर अपलोड केलेला आढळला. येथे दिलेल्या माहितीनुसार, ‘हाला मोदी’ कार्यक्रमात गाणे म्हणणारी व्यक्ती, कुवेती गायक मुबारक अल-रशीद आहेत. 

आम्हाला मनी कंट्रोलच्या यूट्यूब चॅनेलवर एएनआयच्या सौजन्याने मुबारक अल-रशीदचा व्हिडिओ सापडला. ज्यामध्ये त्यांना असे म्हणताना ऐकले जाऊ शकते की, या कार्यक्रमात त्यांनीच ‘सारे जहाँ से अच्छा’ आणि ‘वंदे मातरम्’ गायले होते.

आम्ही व्हायरल व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी कुवेतचे पत्रकार मालक बकीर असद यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी पुष्टी केली की, व्हिडिओमध्ये दुबईचा राजकुमार नाही, परंतु कुवेतचे गायक मुबारक अल-रशीद आहेत.  

आता बनावट पोस्ट शेअर करणाऱ्या ‘kattar_hindu_balak_’ या इंस्टाग्राम वापरकर्त्याचे सोशल स्कॅनिंग करण्याची वेळ होती. आम्हाला आढळले की, या वापरकर्त्याला 1 लाख 10 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात असे आढळून आले की, व्हायरल व्हिडिओ सोबत दुबईच्या राजकुमाराविषयी केलेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ कुवेतमधील त्या वेळेचा आहे, जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी डिसेंबर 2024 मध्ये कुवेतला भेट दिली होती. या व्हिडिओमध्ये कुवेती गायक मुबारक अल-रशीद आहेत. रशीद यांनी ‘हाला मोदी’ कार्यक्रमात ‘सारे जहाँ से अच्छा’ आणि ‘वंदे मातरम्’ गायले होते. 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here