जत : येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सातदिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन स्वच्छ भारत, स्वस्थ भारत हे ब्रीद घेऊन श्री यल्लमादेवी मंदिर परिसर जत येथे करण्यात आल्याची माहिती श्री यल्लमा देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, श्रीमंत शार्दुलसिंहराजे डफळे व प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक बोलताना ते म्हणाले, मंगळवार दि.१८ फेब्रुवारी २०२५ रोजी स. १० वा. शिबीराचे उद्घाटन माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे उपस्थित राहणार आहेत.
यासोबत तहसीलदार प्रवीण धानोरकर, मुख्याधिकारी अशोक कुंभार, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी आजीव सदस्य, कृष्णा बिसले उपस्थित राहणार आहेत.अध्यक्ष म्हणून श्रीमंत शार्दुलसिंह राजे डफळे, श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे, श्रीमंत अमृताराजे डफळे यांच्यासह श्री यल्लमा देवी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी जत नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिबिराच्या समारोप आमदार गोपीचंद पडळकर, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सांगली जिल्हा विभागप्रमुख प्रकाश हाके,उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर गोबी, माजी प्रभारी प्राचार्य डॉ.शिवाजीराव बिसले उपस्थित राहणार आहेत.
शिबिरात स्वयंसेवक परिसर स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, वृक्षलागवड, प्रभात फेरी, मतदान जनजागृती,परिसरातील लोकांचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण व पशुधन आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करणार आहेत. तसेच गटचर्चा, व्याख्यानमाला, विविध स्पर्धा, विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम यांचेही आयोजन केले असून जत पंचक्रोशीतील व परिसरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा व याचा लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.पुंडलिक चौधरी,तुकाराम सन्नके, मेहजबीन मुजावर यांनी केले आहे.