जत : येथील श्री सिध्देश्वर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या दरिबडची शाखेचा शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर व सहाय्यक निंबधक अमोल डफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार २८ फेंब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.
जत तालुक्यात अल्पावधित ठेवीदार,सभासद,ग्राहकांच्या विश्नासास पात्र ठरलेल्या श्री सिध्देश्वर अर्बनला दरिबडची शाखेला परवानगी मिळाली होती.२८ फेब्रुवारीला दरिबडची येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर,आंसगी रोड येथे ही शाखा सुरू होत आहे.
यावेळी दरिबडचीचे सरपंच शिवानंद मोरडी,हभप तुकाराम बाबा,उद्योगपती संभाजी खांडेकर,श्री अमृतानंद स्वामीजी,बबन पांढरे शेठ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
परिसरातील व्यापारी,शेतकरी,नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन चेअरमन ज्ञानेश्वर कोकरे यांनी केले आहे.