जत तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ६ हजार ७८९ घरकुले अवघ्या १० दिवसात मंजूर करण्यात आले. या सर्व लाभार्थ्यांना आ. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते मंजूरी पत्र देण्यात आले. अवघ्या ९० दिवसात ही सर्व घरे पूर्ण करण्याचा मानस प्रशासनाने आखला असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी शिंदे, माजी सदस्य दिग्विजय चव्हाण, आप्पासो मासाळ, माजी जिल्हा परिषद सदस्या सुशिला व्हनमोरे, माणिक वाघमोडे, रविंद्र मानवर, उत्तम महारनूर यांच्यासह सहायक गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर, बंटी नदाफ, रमेश देवर्षी आदी जन उपस्थित होते.
आमदार पडळकर म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेतून राज्यात २० लाख घरकुले बांधण्यात येणार आहेत. राज्यातील एकही कुटुंब घराविना राहणार नाही. त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ज्यांना घरकुल मंजूर झाली आहेत. त्यांनी घरकुल बांधून घ्यावीत. अडचण आल्यास संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले.