संजय घोडावत एक उद्यमी, समाजसेवी, और दूरदर्शी व्यक्तित्व

0
153

अतिग्रे: उद्योगपती संजय घोडावत यांचा ६० वा वाढदिवस घोडावत विद्यापीठात उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे, क्रीडापटू स्वप्निल कुसाळे,ईएनटी सर्जन, डॉ.अशोक पुरोहित, शिक्षण तज्ञ डॉ. अनिल पाटील व महाबळ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांना ‘एसजीयू आयकॉन’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बॉलीवूड अभिनेता अंशुमन खुराना उपस्थित होते.

तसेच संजय घोडावत यांच्या पत्नी नीता घोडावत, श्रेणिक घोडावत, सलोनी घोडावत, श्रेया घोडावत,विजयचंदजी, जयचंदजी, राजेशजी, व राकेशजी घोडावत आणि कुटुंबीय उपस्थित होते.

घोडावत विद्यापीठाच्या ‘उमंग’ या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटनही यावेळी करण्यात आले.संजय घोडावत ग्लोबल एज्युकेशन कार्यक्रमाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.यावेळी एमडी श्रेणिक घोडावत यांनी संजय घोडावत ग्रुपच्या उद्योगांची माहिती देऊन ‘2030 व्हिजन आणि मिशन’बद्दलच्या भविष्यकालीन योजना सांगितल्या.आयुष्यमान खुरानाने संजय घोडावत यांनी उद्योग क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे व योगदानाचे कौतुक केले.

यावेळी संजय घोडावत यांच्या कर्तुत्वावर आधारित संजय आवटे यांनी संपादित केलेल्या’माझा अभिमान’या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.’एसजीयु आयकॉन’ पुरस्काराचे वाचन डॉ.विराट गिरी यांनी केले.सूत्रसंचालन सोहन तिवडे तर प्रा.डिसोजा यांनी आभार मानले. याप्रसंगी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा.डॉ.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे तसेच सामाजिक, राजकीय,आर्थिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर,विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

 

अभिनेता अंशुमन खुराणाच्या गायन नृत्याने उपस्थितांनी ठेका धरला.त्यानी पानी दा,रंग देखवे हे गाणे गायले तसेच नृत्य देखील केले यावर सर्वांनी जल्लोष केला.

फोटोओळी

जयसिंगपूर : उद्योगपती संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात ‌साजरा करण्यात आला.यावेळी कुंटुबियासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here