सांगली : कृषि चिकित्सालय फळरोपवाटिका, कुपवाड प्रक्षेत्रावरील मजुरी कामे, ट्रॅक्टर व इतर मशीनने करावयाच्या कामांची तसेच सामुग्री पुरवठा कामी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेसंबंधीचे निविदा अर्ज, सर्व अटी व शर्ती कृषि अधिकारी, कृषि चिकित्सालय (फळरोपवाटिका), कुपवाड या कार्यालयाच्या नोटीस बोर्ड वरती प्रकाशित करण्यात आले आहेत.
निविदेचे अर्ज दि. 2 ते 11 मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत संबंधित कार्यालयात उपलब्ध असणार आहेत.निविदा प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी कार्यालयाशी संपर्क करावा, असे कृषि चिकित्सालय फळरोपवाटिका, कुपवाड कार्यालयाचे कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे – 7798389493, 7666401190, 9404396177.