जत : सांगली बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या जत दुय्यम बाजार समिती आवारात रविवारपासून (ता.२ मार्च) यंदाच्या बेदाणा सौद्यांना प्रारंभ होत आहे,अशी माहिती सहाय्यक सचिव सोमनिंग चौधरी यांनी दिली.
गतवर्षीपासून माजी आमदार विक्रमसिंह सावंत याच्या प्रयत्नातून जतमध्ये बेदाणा सौद्यांना प्रांरभ करण्यात आला होता.त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला. जत दुय्यम बाजार समिती आवारात बैदाणा सौदे या वर्षीही आज रविवारीपासून सुरू होत आहेत.यामुळे जतसह कर्नाटक सीमाभाग, तसेच पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या भागांतील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची सोय होणार आहे.
या भागात उच्च प्रतीचा बेदाणा तयार होतो. आजवर सांगली, तासगाव येथे होणारा सौदा गतवर्षीपासून जतमध्ये सुरू झाल्याने भविष्यात येथील सौदा जागतिक पातळीवर चर्चेत येईल. त्यामुळे हा सौदा जगभर प्रसिद्ध होईल.दरम्यान जत एमआयडीसी येथील एपीए कोल्ड स्टोरेज येथे बेदाणा ठेवण्याची सोयही बाजार समितीकडून करण्यात आली आहे.आजपासून सुरू होणाऱ्या या सोद्यात बेदाणा उत्पादकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही चौधरी यांनी केले आहे.