बसवराज पाटील यांचा वाढदिवस उपेक्षितांच्या सहवासात साजरा!

0
58

जत : जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी आपला वाढदिवस समाजातील उपेक्षित, वंचित घटकांच्या सहवासात साजरा करत एक सामाजिक बांधिलकी जपली. जत येथील मूकबधिर व मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना वही व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच, सांगली येथील वृद्धाश्रमात एक क्विंटल तांदळाचे वाटप करून तेथील वृद्धांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

या उपक्रमात जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी शाल, श्रीफळ देऊन बसवराज पाटील यांचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकही उपस्थित होते.

दरम्यान, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व वारणा उद्योग समूहाचे प्रणेते आमदार डॉ. विनय कोरे (सावकार), विजयपूरचे आमदार बसनगोंडा पाटील-यत्नाळ, तसेच हातकणंगलेचे आमदार दलितमित्र अशोकराव माने यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना बसवराज पाटील म्हणाले,”वाढदिवस हा केवळ औपचारिकता न राहता समाजातील दुर्लक्षितांसोबत साजरा करण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. त्यांच्या डोळ्यातला आनंद व आशीर्वाद हीच माझ्यासाठी खरी संपत्ती आहे. पुढील काळातही समाजासाठी अशाच उपक्रमांची मालिका राबवणार आहे.”

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here