जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअरसह विविध दाखल्यांचे वाटप
जत : जत तालुक्यात विद्यार्थ्यांसह, नागरिकांना लागणारे विविध प्रकारचे दाखले वेळेत देण्याबाबत अधिकाधिक भर आहे. १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ अखेर जातीचे प्रमाणपत्र १७०१, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र १०२५ असे विविध प्रकारचे ७ हजार ११ दाखले, प्रमाणपत्र वितरित केल्याची माहिती प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी दिली.
प्रांताधिकारी नष्टे, तहसीलदार धानोरकर म्हणाले, एप्रिल ते जूनअखेर जातीचे प्रमाणपत्र १७०१, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र १०२५,असे एकूण २ हजार ७२६ दाखले उपविभागीय अधिकारी जत उपविभाग जत यांच्या मार्गदर्शनाखाली वितरित करण्यात आले आहेत. तसेच तहसीलदार जत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पन्न प्रमाणपत्र ४ हजार २९४, साधा रहिवास ३९, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र १ हजार ५९९, अल्पभूधारक ३५४, आर्थिक दुर्बल घटक १६९ व आर्थिक दुर्बल घटक केंद्रीय ७५ शेतकरी प्रमाणपत्र ५० व इतर ४३१ असे एकूण एकंदर ७ हजार ११ दाखले, प्रमाणपत्र वितरित केले आहेत.
सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, यापुढेही जास्तीत जास्त नागरिकांनी विविध प्रकारचे दाखले प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्याही दलाल वा मध्यस्थी यांच्याशी संपर्क न करता सेतू केंद्र व महा-ई-सेवा केंद्राशी संपर्क साधावा. तसेच सर्व प्रमाणपत्राकरिता शासकीय फीऐवजी जादा कोणतीही रक्कम देण्यात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध प्रकारचे दाखले वेळेत मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने तालुका प्रशासनाने दक्षता घेतली आहे. अडवणूक होत असल्यास कारवाई होईल, असे सांगण्यात आले.




