ताबडतोब दुरुस्ती करावी ; – बसवराज पाटील यांची मागणी
जत : डफळापूर ते मिरवाड, जिरग्याळ मार्गे एकुंडी दरम्यानचा प्रमुख राज्य मार्ग (प्रजिमा ६४) हा मार्ग पूर्णपणे उखडला असून, मोठमोठे खड्डे, वाहतुकीला अडथळे, व पावसामुळे अधिकच बिकट झालेली अवस्था यामुळे प्रवाशांना प्राण धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्याची तातडीने डागडुजी व डांबरीकरण करण्याची जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी संबंधित विभागांकडे जोरदार मागणी केली आहे.हा रस्ता सामान्य जनतेच्या रोजच्या वापराचा असून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जनतेच्या जिवाशी खेळ होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी रस्त्याचे त्वरित सर्वेक्षण करून काम हाती घेण्याचे आदेश द्यावेत,अशी आग्रही मागणी केली आहे.
जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी जनतेतूनही होत आहे.जनतेच्या सुरक्षेशी कुठलाही तडजोड सहन केली जाणार नाही, प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी!”
– बसवराज पाटील




