धुळे जिल्ह्यातील साक्री येथून शिक्षणासाठी चिपळुणात आलेल्या नीलेश अहिरे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी अहिरे या नवविवाहित दाम्पत्याने चिपळुणजवळील गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली.
नीलेशने दहावीनंतर गाव सोडून चिपळूणमध्ये येऊन शिक्षण घेतल्यानंतर मोबाइल शॉपीचा व्यवसाय सुरू केला होता. त्याचा स्वभाव शांत, मृदू आणि मेहनती होता. ८ मे रोजी त्याचा अश्विनीसोबत विवाह झाला होता. नवदांपत्याचे आयुष्य सुरळीत सुरू असताना त्यांनी अचानक असे टोकाचे पाऊल उचलले, हे समजून न येणारे आणि दुःखद आहे.
सध्या एनडीआरएफ, पोलिस व नातेवाईक शोधकार्यात गुंतले आहेत. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिपळूण पोलिस अधिक तपास करत आहेत.
#Chaluwartha #MarathiNews #SadNews #CoupleSuicide #VashishtiNadi #Chiplun #Dhule




