
बेंळूखी : बेंळूखी (ता.जत) ग्रामस्थांच्या वतीने भूमीपुत्र, आदर्श पोलीस पाटील बाबासाहेब (पंकज) शिंगाडे यांचा नागरी सत्कार उत्साहात पार पडला. गावाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सुरक्षेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ग्रामस्थांनी एकमुखाने त्यांचा गौरव केला.माजी सरपंच संभाजी कदम सर यांच्या नियोजनातून हा गौरव सोहळा संपन्न झाला.माजी सैनिक शिवाजी चव्हाण,सरपंच श्रीमती चव्हाण यांच्याहस्ते शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून शिंगाडे यांचा गौरव केला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेब शिंगाडे यांच्या प्रामाणिक व निस्वार्थ सेवाभावाचे मनापासून कौतुक केले. पोलीस पाटील म्हणून त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता, ग्रामशिस्तीबाबतची बांधिलकी आणि ग्रामविकासासाठीचे सातत्यपूर्ण प्रयत्न यांची उपस्थितांनी विशेष नोंद घेतली.
गावातील तरुणांसाठी ते प्रेरणास्थान असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे. सत्कार समारंभाला ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बाबासाहेब शिंगाडे यांनी गावकऱ्यांच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि “गावाच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षेसाठी आयुष्यभर सेवा देत राहीन”असा निर्धार व्यक्त केला.



