जत :‘श्री सिद्धेश्वर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., जत’ या संस्थेचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या निमित्ताने सुमारे ५०० पेरूच्या रोपांचे वाटप करून पर्यावरण संरक्षणाचा मौल्यवान संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात सकाळी सत्यनारायण पूजा व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर कोकरे यांनी गेल्या वर्षी सोसायटीची पायाभरणी केली असून, केवळ एका वर्षाच्या अल्पावधीत संस्थेने तब्बल ३० कोटी रुपयांचा व्यवसाय साधला आहे. तसेच दरिबडची येथे संस्थेची शाखा यशस्वीपणे कार्यरत आहे.
या कार्यक्रमास चंद्रशेन मानेपाटील, श्रीमंत ठोंबरे, मोहन चव्हाण, इब्राहीम नदाफ, सुधीर जमगे, संचालक तांबे सर आदी मान्यवर उपस्थित होते. दिवसभर सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला.
संस्थेच्या या यशस्वी प्रवासाचा पहिला टप्पा पर्यावरणपूरक उपक्रमांनी सजला असून, पुढील वाटचाल सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




