आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून पुण्यात हल्ल्याचा प्रयत्न

0
40

पुणे : फुरसुंगी (हडपसर) येथील द्वारकाधीश गोशाळेत आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांनी धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सदाभाऊ खोत गोशाळेची पाहणी करण्यासाठी गेले असता, गोरक्षकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

पार्श्वभूमी

सुमारे दोन महिन्यांपूर्वी सांगलीतील शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांच्या दहा म्हशी जबरदस्तीने या गोशाळेत आणून ठेवण्यात आल्या होत्या. न्यायालयाकडून आदेश मिळाल्यानंतर शेतकरी गोशाळेत म्हशी परत घेण्यासाठी गेले असता, म्हशी गायब असल्याचे उघड झाले. विचारणा केली असता, गोशाळा चालकांनी “म्हशी डोंगरावर चरायला गेल्या व परतल्या नाहीत” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.

सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला

या प्रकारात शेतकऱ्यांसोबत गेलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांनी बाचाबाची करून धक्काबुक्की केली. या घटनेनंतर सदाभाऊ खोत आणि शेतकरी संतप्त झाले असून सिंहगड रोड पोलीस स्थानकासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

सदाभाऊ खोत यांचा इशारा

सदाभाऊ खोत यांनी गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठा लॉबी-सिंडिकेट सुरू असल्याचा आरोप केला.
“गोरक्षक म्हणून काहीजण कॉर्पोरेट ऑफिसमधून धंदा करतात, आणि खरा त्रास मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. सरकारने यावर कारवाई केली नाही, तर आम्ही पोलीस स्टेशनसमोर जनावरांची छावणी उभारू,” असा इशारा त्यांनी दिला.

खोत यांनी पुढे म्हटलं,
“आम्ही गाई-म्हशींत राहून त्यांचं शेण, दूध काढतो, त्यातून आमचं घर चालतं. पण गोरक्षणाच्या नावाखाली काही जण फक्त व्यवसाय करत आहेत. हे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, सरकारने तत्काळ लक्ष घालायला हवं.”

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here