मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; पोलिसांकडून 40 अटींचं पत्र, शांततेत आंदोलनाची हमी

0
220


मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर ते आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून निघण्याआधी पोलिस प्रशासनाने जरांगे यांना 40 अटींचं पत्र दिलं असून या प्रवासादरम्यान सर्व अटींचं पालन करण्याची जबाबदारी आंदोलकांवर सोपवण्यात आली आहे.

पोलिसांच्या प्रमुख अटी:

  1. प्रवासादरम्यान आक्षेपार्ह घोषणा व जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये होऊ नयेत.
  2. मोर्चा जालना-मुंबई या आधी घोषित मार्गानेच निघावा.
  3. अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाची वाहने यांना अडथळा येऊ नये.
  4. सार्वजनिक वा खासगी मालमत्तेचं नुकसान झाल्यास भरपाई आयोजक व आंदोलनकर्त्यांनीच करावी.
  5. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांकडे शस्त्रं, दगड, काठ्या असू नयेत.

जरांगेंची भूमिका

“शांततेत आंदोलन हा आमचा लोकशाही हक्क आहे. न्यायदेवता आमचं म्हणणं ऐकेल आणि न्याय करील याची खात्री आहे. 29 ऑगस्टला मी आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार,” असं जरांगे म्हणाले.

त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समितीवरही टीका केली. “तेरा महिने झाले तरी समिती अभ्यास करत आहे, फक्त मुदतवाढ दिली जाते,” असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १० ते १२ हजार समर्थक अंतरवाली सराटी येथे जमण्याची शक्यता असल्याने जालना पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here