📍 बीड (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावात माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय ३४) यांनी गोळी झाडून आयुष्य संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले असून, कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आणि राजकारणात सक्रिय सहभाग होता. कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या संपर्कात आल्यानंतर गोविंद तिच्या प्रेमात आकंठ बुडाला. तिला महागडे मोबाईल, सोन्याचे दागिने दिल्यानंतर पूजाची नजर गोविंदच्या गेवराईतील आलिशान बंगल्यावर व पाच एकर जमिनीवर पडली.

तिने थेट अट घातली की, “गेवराईचा बंगला माझ्या नावावर कर नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन.” या धमकीमुळे त्रस्त झालेल्या गोविंदने काही अंतरावर जाऊन स्वतःवर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली.
या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.



