मुंबई : पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक प्रगतीत ऐतिहासिक बदल घडवणारा निर्णय अखेर प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे बहुप्रतिक्षित ड्राय पोर्ट उभारण्याच्या मागणीला गती मिळाली असून मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाला हिरवा दिवा दाखवला आहे. राज्य सरकारमार्फत या योजनेचा केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार असून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धार राणे यांनी व्यक्त केला आहे.
ड्राय पोर्ट म्हणजे नेमकं काय?
बंदराशी थेट जोडणारे हे अंतर्गत लॉजिस्टिक्स टर्मिनल असून सी-पोर्टप्रमाणेच कंटेनर स्टोरेज, कस्टम क्लिअरन्स, पॅकिंग, ट्रान्सशिपमेंट अशा सर्व सुविधा येथे उपलब्ध होतात. रेल्वे आणि रस्त्याद्वारे थेट JNPT सारख्या बंदरांशी जोडणी असल्याने मालवाहतुकीचा वेग वाढतो आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, जालना यांसारख्या ठिकाणी अशी केंद्रे आधीच कार्यरत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार
सांगली-कोल्हापूर-सातारा-सोलापूर या जिल्ह्यांतून होणाऱ्या द्राक्ष, हळद, डाळिंब, आंबा, केळी-पेरू, पालेभाज्या आणि फळभाज्या निर्यातीस मोठ्या पायाभूत सुविधांची गरज आहे. सध्या मुंबई व JNPT बंदरापर्यंत माल देताना वेळ आणि खर्च वाढतो. रांजणी येथे 2,250 एकर जमीन उपलब्ध असून त्यापैकी 250 एकर ड्राय पोर्टसाठी आरक्षित करण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरु आहे. रेल्वे मार्ग आणि महामार्गाजवळ असल्याने हे ठिकाण अत्यंत सोयीचे आहे.
मागील काळातील प्रयत्न
मविआ सरकारच्या काळात पालकमंत्री जयंत पाटील यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला होता. मंत्रालयात बैठक घेऊन JNPT व्यवस्थापनासोबत लॉजिस्टिक पार्कची संकल्पना सादर करण्यात आली. परंतु प्रशासकीय पातळीवरील गुंतागुंत आणि बदलत्या परिस्थितीमुळे योजना पुढे सरकू शकली नाही.
राणे यांच्याकडून ठोस गती
अलीकडेच झालेल्या बैठकीत मंत्री नितेश राणे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रमुख अधिकारी, आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला.
राणे म्हणाले,
**“रांजणी ड्राय पोर्टची मागणी अत्यंत सकारात्मक आहे. हा प्रकल्प झाल्यास या संपूर्ण पट्ट्यात औद्योगिक विकासाला मोठी गती




