जत : येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या जत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी तब्बल सात जण रिंगणात असून अकरा प्रभागांतील २३ जागांसाठी प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २३ जागांसाठी तब्बल ९४ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने अनेक प्रभागांमध्ये तिरंगी, चौरंगी आणि काही ठिकाणी बहुरंगी लढत रंगणार आहे.
२८ हजार ९० मतदार ठरवतील शहराचे भवितव्य
२०१२ साली स्थापन झालेल्या जत नगरपरिषदेची ही तिसरी सार्वत्रिक निवडणूक आहे. ३५,३३६ लोकसंख्या असलेल्या जत शहरात अनुसूचित जातीची लोकसंख्या ५,८५० तर अनुसूचित जमातीची १,५१२ आहे. येत्या निवडणुकीत २८,०९० मतदार शहराचे राजकीय भवितव्य निश्चित करणार आहेत.
तिरंगी ते चौरंगी—काही प्रभागात बहुरंगी संघर्ष
महाविकास आघाडी आणि महायुतीतील सूर न जुळल्याने भाजप आणि काँग्रेसने स्वतंत्र पॅनेल उभे केले आहेत. सुरेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत घड्याळाचे पॅनेल उभे केले, तर शिवसेनेने प्रथमच नगराध्यक्ष आणि १५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे तिरंगी असलेल्या अनेक लढती आता चौरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी वळण घेणार आहेत. अपक्ष उमेदवारांची उपस्थितीही काही प्रभागांत मोठे आव्हान ठरणार आहे.
प्रभागनिहाय उमेदवार—२३ जागांसाठी ९४ उमेदवार मैदानात
प्रभाग 1 अ : योगेश कांबळे (राष्ट्रवादी), महेश साबळे (काँग्रेस), राजकुमार साळे (भाजप), दिलीप चव्हाण (शिवसेना)
प्रभाग 1 ब : मेघा देवकर (राष्ट्रवादी), रंजना पवार (काँग्रेस), लक्ष्मीबाई कैकाडी (भाजप)
प्रभाग 2 अ : महादेव कोळी (काँग्रेस), शरणाप्पा अक्की (राष्ट्रवादी), प्रमोद हिरवे (भाजप), श्रावण चौगुले (शिवसेना)
प्रभाग 2 ब : डॉ. वीणा तंगडी (भाजप), गौरी पाटील (राष्ट्रवादी), शोभा निडोणी (काँग्रेस)
प्रभाग 3 अ : सीमा पट्टणशेट्टी (भाजप), हेमा चव्हाण (राष्ट्रवादी), गिताजंली जाधव (काँग्रेस), सुनंदा चव्हाण (शिवसेना)
प्रभाग 3 ब : धैर्यशील सावंत (काँग्रेस), गौतम ऐवाळे (भाजप), सागर चंपान्नावर (राष्ट्रवादी), रोहित कांबळे (शिवसेना), राहुल शिंदे (अपक्ष)
प्रभाग 4 अ : सुभाष कांबळे (भाजप), संतोष कांबळे (काँग्रेस), संतोष साबळे (बसपा-राष्ट्रवादी), प्रमोद सावंत (शिवसेना), हर्षवर्धन कांबळे (रिपाइं-आठवले गट, अपक्ष)
प्रभाग 4 ब : तसमिन जमादार (बसपा-राष्ट्रवादी), हेमलता चव्हाण (भाजप), निलाबाई कोळी (काँग्रेस), प्रिती गायकवाड (शिवसेना), नजमा सत्ती (रिपाइं-आठवले, अपक्ष)
प्रभाग 5 अ : सारिका ऐडके (राष्ट्रवादी), हयातबी यादव (भाजप), अश्विनी माळी (शिवसेना)
प्रभाग 5 ब : युवराज निकम (काँग्रेस), इमरान गवंडी (राष्ट्रवादी), निलेश मटगार (भाजप), अरशद गंवडी (शिवसेना)
प्रभाग 6 अ : संगीता सोनूले (भाजप), मनीषा माने (काँग्रेस), शारदा कणसे (राष्ट्रवादी), दिपाली देवकुळे (शिवसेना)
प्रभाग 6 ब : विक्रम ताड (भाजप), सचिन मदने (राष्ट्रवादी), विक्रम ढोणे (रासप-काँग्रेस), अनिकेत मोटे (शिवसेना), राघवेंद्र चौगुले व संजय शितोळे (अपक्ष)
प्रभाग 7 अ : अर्चना केंगार (राष्ट्रवादी), रंजना बाबर (भाजप), खेहल हविनाळ (शिवसेना), मनिषा साबळे (काँग्रेस)
प्रभाग 7 ब : स्वप्नील शिंदे (राष्ट्रवादी), प्रवीकुमार वाघमोडे (भाजप), संजय वाघमोडे (काँग्रेस), नागेश मदने (शिवसेना), रणवीर कदम (अपक्ष)
प्रभाग 8 अ : रवींद्र मानवर (भाजप), विकास माने (काँग्रेस), हेमंत चौगुले (राष्ट्रवादी), नवनाथ पवार (अपक्ष)
प्रभाग 8 ब : सुवर्णा पाटणकर (राष्ट्रवादी), तेजस्विनी व्हनमाने (शिवसेना)
प्रभाग 9 अ : शबाना जमखंडी (काँग्रेस), स्वप्ना स्वामी (भाजप), रेश्मा नदाफ (राष्ट्रवादी)
प्रभाग 9 ब : मोहनभैय्या कुलकर्णी (काँग्रेस), दीपक उर्फ संतोष मोटे (भाजप), लक्ष्मण एडके (राष्ट्रवादी)
प्रभाग 10 अ : सलीम नदाफ (काँग्रेस), मोहिद्दीन इनामदार (राष्ट्रवादी), फिरोज नदाफ (अपक्ष), पवन कुंभार (भाजप)
प्रभाग 10 ब : सुवर्णा बामणे (राष्ट्रवादी), अनुसया माने (काँग्रेस), सुप्रिया बाबर (भाजप), संजीवनी शेटे (शिवसेना), नरगीज नदाफ, तेजस्विनी सोनवणे
प्रभाग 11 अ : काजल काळे (काँग्रेस), सुप्रिया कोळी (भाजप), प्राजक्ता शिंदे (राष्ट्रवादी)
प्रभाग 11 ब : नंदिनी मठपती (भाजप), मीनाक्षी अक्की (राष्ट्रवादी), तस्लिम अत्तार (काँग्रेस)
प्रभाग 11 क : संग्राम जगताप (राष्ट्रवादी), मिथुन भिसे (भाजप), कुशाल बिज्जर्गी (काँग्रेस), भास्कर जाधव (शिवसेना)
कोण मारणार अंतिम बाजी?
या निवडणुकीत विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर, तसेच माजी आमदार विलासराव जगताप आणि विक्रमसिंह सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. स्थानिक गट-तट, राजकीय समीकरणे आणि प्रत्येकीचा प्रभाव यामुळे ही निवडणूक अभूतपूर्व ठरणार आहे. जतकर पुन्हा त्रिशंकू कौल देणार की स्पष्ट बहुमत एकाच पक्षाला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नगराध्यक्षपदासाठी सात जणांचे नशीब पणाला
नगराध्यक्ष पदासाठी डॉ. रवींद्र आरळी (भाजप), सुजय शिंदे (काँग्रेस), सुरेश शिंदे (राष्ट्रवादी), सलीम गवंडी (शिवसेना), अर्जुन कुकडे (मार्क्सिस्ट), नवनाथ पवार व मल्लिकार्जुन हत्ती (अपक्ष) हे सात जण रिंगणात उतरले आहेत.
Move upMove downToggle panel: Post Settings
Post template:?















Primary category:? Auto select a category Featured – [ id: 907 ] Uncategorized – [ id: 1 ] आरोग्य – [ id: 16 ] इतर जिल्हे – [ id: 3 ] – कोल्हापूर – [ id: 5 ] – पश्चिम महाराष्ट्र – [ id: 10 ] – पुणे – [ id: 8 ] – महाराष्ट्र – [ id: 9 ] – सांगली – [ id: 4 ] – सातारा – [ id: 7 ] – सोलापूर – [ id: 6 ] गुन्हे – [ id: 14 ] ताज्या घडामोडी – [ id: 2 ] देश-विदेश – [ id: 13 ] राजकारण – [ id: 12 ] व्हिडीओ – [ id: 11 ] साहित्य – [ id: 15 ]
If the posts has multiple categories, the one selected here will be used for settings and it appears in the category labels.
Sidebar position:?




Custom sidebar:?
Subtitle:
This text will appear under the title
Gallery:
Add images which could be used to display a gallery on a post.
Quote on blocks:
Show a quote (only when this article shows up in blocks that support quote and only on blocks that are on one column)
Source name:
This name will appear at the end of the article in the “source” spot on single posts
Source url:
Full url to the source
Via name:
Via (your source) name, this will appear at the end of the article in the “via” spot
Via url:
Full url for via
Custom Label:
This label will appear on Flex modules/blocks as a category tag. It can also be used as a custom field within the Custom Field shortcode: td_custom_cat_name
Custom Label url:
Full url for Custom Label.It can also be used as a custom field within the Custom Field shortcode: td_custom_cat_name_url
Link SuggestionsClick on the button to copy URL or insert link in content. You can also drag and drop links in the post content.
Move upMove downToggle panel: Link Suggestions
We can’t show any link suggestions for this post. Try selecting categories and tags for this post, and mark other posts as Pillar Content to make them show up here.
WP QUADS – Hide Ads
Move upMove downToggle panel: WP QUADS – Hide Ads
Hide all ads on page
Hide default ads, use manually placed ads
Hide all ads in sidebar
Hide ad on beginning
Hide ad in middle
Hide ad on end
Hide ad after MoreTag
Hide ad before last paragraph
Sassy Social Share
Move upMove downToggle panel: Sassy Social Share
Disable Standard Sharing interface on this post
Disable Floating Sharing interface on this post
iZooto push notifications
Move upMove downToggle panel: iZooto push notifications
Featured Video
Move upMove downToggle panel: Featured Video
Paste a video link from Youtube, Vimeo, Dailymotion or Twitter it will be embedded in the post and the thumb used as the featured image of this post.
You need to choose Video Format from above to use Featured Video.
Notice: Use only with those post templates:
- Post style default
- Post style 1
- Post style 2
- Post style 9
- Post style 10
- Post style 11
- Find more about this feature
Click to Chat
Move upMove downToggle panel: Click to Chat
Featured Audio
Move upMove downToggle panel: Featured Audio
LiteSpeed
Move upMove downToggle panel: LiteSpeedOpen publish panel




