सांगलीत हिट-अ‍ॅण्ड-रन; १२ जखमी,चालक ताब्यात

0
5

सांगली : शहरात रात्री मद्यधुंद अवस्थेत विरुद्ध दिशेने कार चालवणाऱ्या चालकाने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात लहान मुलासह १२ जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. संतापलेल्या नागरिकांनी मोटारचालकाला पकडून बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले.

घटना कल्पतरू मंगल कार्यालय–रेल्वे स्टेशन मार्गावर रात्री नऊच्या सुमारास घडली. संतोष झवर हा चालक नशेत भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने कार चालवत होता. अचानक समोरून येणाऱ्या अनेक वाहनांना त्याने धडक दिली. यात काही दुचाकी आणि मोटारींचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी कारचा पाठलाग करून चालकाला पकडले. संतप्त जमावाने मोटारीची तोडफोड केली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here