आष्टा (ता. २४) : वाळवा तालुक्यातील एका गावात महिलेला अश्लील इशारे करून विनयभंग केल्याप्रकरणी गणपती शिवाजी निरूखे (रा. बहादुरवाडी, ता. वाळवा) या तरुणावर आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १८) दुपारी सुमारे १.३० वाजता पीडित महिला एका कार्यालयाच्या बाहेर थांबली असताना संशयित निरूखे याने तिच्याकडे पाहून डोळे व हातांनी अश्लील इशारे केले. यापूर्वीही तो दुचाकीवरून तिचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत असल्याची तक्रार आहे.
याप्रकरणी आष्टा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.




