– विकास साबळे
जत : “हर्षवर्धन कांबळे सारख्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि समाजाभिमुख तरुणाला वार्ड क्रमांक चारमधून भरघोस मतांनी विजयी करा,” असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केले.
गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून जत शहर व तालुक्याच्या राजकारणात सक्रिय राहून आदर्श कार्य करणारे नेतृत्व म्हणून संजय कांबळे यांची ओळख आहे. उपसरपंच,सरपंच म्हणून काम करताना दुष्काळी काळात वाड्या–वस्त्यांवर टँकरवाटपाची प्रभावी व्यवस्था, दिवाबत्ती, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा यांसारख्या मुलभूत सुविधांकडे त्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिले.माय–बहिणींच्या आशीर्वादाने समाजसेवा करताना त्यांनी शहरातील रस्ते–गटारी कामांसाठी वेळोवेळी मोर्चे, आंदोलने, उपोषण करत प्रशासनाला कामे करण्यास भाग पाडले.
आरपीआयमध्ये सर्व जातीधर्मांना सामावून घेत पक्षवाढीसाठी केलेल्या कामामुळे ते जिल्हाभर ठसा उमटवू शकले. गोरगरीब, मागासवर्गीय, वंचित, आदिवासी समाजातील कुणालाही शासकीय कार्यालये किंवा पोलीस स्टेशनची गरज भासल्यास दिवस-रात्र मदतीसाठी धाव घेणारे नेतृत्व म्हणजे संजय कांबळे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ मिळाला आहे.
याच वारशाचा ध्यास घेऊन त्यांचा मुलगा हर्षवर्धन कांबळे शिक्षण पूर्ण करून पुण्यावरून जतला परतला. मोठ्या शहरात चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकत असतानाही समाजसेवा करण्यासाठी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा त्याने निर्णय घेतला. शहराचा विकास, वार्डातील लोकांची सेवा आणि तरुण नेतृत्वातून सकारात्मक बदल घडवण्याचे उद्दिष्ट त्याने ठेवले आहे.
अशा उच्चशिक्षित, प्रामाणिक आणि समाजाभिमुख उमेदवाराला वार्ड क्रमांक चारमधून भरघोस मताधिक्याने विजयी करून जत शहराच्या विकासाला बळ द्यावे, असे आवाहन विकास साबळे यांनी केले.




