जत : आगामी नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट, राष्ट्रीय समाज पक्ष व डीपीआय पक्षाच्या सर्व उमेदवारांचा प्रचार वेग घेत आहे. वार्डनिहाय आयोजित दौऱ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पक्षाची विकासनिष्ठ भूमिका, आगामी कामांचा सविस्तर रोडमॅप आणि स्थानिक प्रश्नांवरील ठोस उपाययोजना थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे.वरिष्ठ नेते विक्रमसिंह सावंत व प्रकाशराव जमदाडे यांनी होम-टू-होम भेटी घेऊन मतदारांशी संवाद साधत प्रचाराला जोम दिला.
वार्ड क्र. ११ मधून काँग्रेस-आघाडीचे काजल राहुल काळे, तस्लीम सद्दाम अत्तार व कुशल माणिक बिज्जरगी हे नगरसेवक पदासाठी मैदानात असून तर वार्ड क्र. ६ मधून मनीषा सचिन माने (काँग्रेस) आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे विक्रम दादासो ढोणे हे कपबशी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
दौर्यादरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष पाहून तातडीच्या उपाययोजनांबाबत आश्वासन दिले. पाणीपुरवठा, स्वच्छता, रोड विकास, नालेसफाई, स्ट्रीटलाइट्स आदी मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जत शहराच्या सर्वांगीण व पारदर्शक विकासासाठी श्री. सुजयनाना शिंदे यांचे सक्षम नेतृत्व निश्चितच नवे मापदंड प्रस्थापित करील, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.




