सांगली जिल्ह्यातील ८ नगरपालिकासाठी 75.96% मतदानासह निवडणूक प्रक्रिया उत्साहात पूर्ण | — 21 डिसेंबरला होणार मतमोजणी

0
21

जिल्ह्यातील 75.96% मतदानासह निवडणूक प्रक्रिया उत्साहात पूर्ण
— 21 डिसेंबरला होणार मतमोजणी


सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषद व 2 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक–2025 मध्ये मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सरासरी 75.96 टक्के मतदान नोंदवले. राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशानुसार पूर्वनियोजित 3 डिसेंबरऐवजी आता 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे.


🔶 नगरपरिषद/नगरपंचायतीनिहाय मतदानाची सविस्तर आकडेवारी

जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस या 6 नगरपरिषद तसेच शिराळा व आटपाडी या 2 नगरपंचायतींत मतदान शांततेत पार पडले. एकूण मतदारसंख्या व झालेले मतदान पुढीलप्रमाणे :

१) उरूण–ईश्वरपूर नगरपरिषद

एकूण मतदार : 64,215

मतदान : 47,608

टक्केवारी : 74.14%

२) विटा नगरपरिषद

एकूण मतदार : 46,332

मतदान : 36,770

टक्केवारी : 79.36%

३) आष्टा नगरपरिषद

एकूण मतदार : 30,573

मतदान : 22,856

टक्केवारी : 74.76%

४) तासगाव नगरपरिषद

एकूण मतदार : 32,994

मतदान : 23,249

टक्केवारी : 70.46%

५) जत नगरपरिषद

एकूण मतदार : 28,090

मतदान : 20,464

टक्केवारी : 72.85%

६) पलूस नगरपरिषद

एकूण मतदार : 22,067

मतदान : 17,716

टक्केवारी : 80.28%

७) शिराळा नगरपंचायत

एकूण मतदार : 13,095

मतदान : 10,879

टक्केवारी : 83.08%

८) आटपाडी नगरपंचायत

एकूण मतदार : 20,611

मतदान : 16,410

टक्केवारी : 79.62%


🔶 निवडणूक प्रक्रिया सुरळीत — प्रशासनाचे नियोजन यशस्वी

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहआयुक्त (नगर प्रशासन) दत्तात्रय लांघी, डॉ. पवन म्हेत्रे, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक नियोजन करण्यात आले होते.

सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा

दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोय

गुलाबी मतदान केंद्रे, विशेष सजावट

चोख पोलीस बंदोबस्त, प्रत्येक केंद्रावर कडक सुरक्षा

निर्भय वातावरणात महिलांसह युवा मतदारांचा वाढता सहभाग

जिल्ह्यातील सर्व 8 ठिकाणी मतदानाची प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडल्याचा दावा प्रशासनाने केला.


🔶 मतमोजणीचा दिवस — 21 डिसेंबर 2025

सुधारित कार्यक्रमानुसार मतमोजणी दि. 21 डिसेंबर 2025, सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. सर्व उमेदवार व पक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले असून जिल्ह्यातील आठही नगरपरिषद/नगरपंचायतींच्या निकालांवर सर्वांची नजर आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here