काँग्रेस २५ गट व ४९ गणांवर लढणार; मित्रपक्षांना उर्वरित जागा

0
68

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ६१ गटांपैकी २५ गट आणि पंचायत समितीच्या १२२ गणांपैकी ४९ गणांमध्ये काँग्रेस निवडणूक लढविणार आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचा समावेश आहे. शिराळा आणि आटपाडी तालुक्यांत काँग्रेसने एकही उमेदवार उभा केलेला नाही. मात्र पलूस आणि कडेगाव तालुक्यांतील सर्व गट व गण काँग्रेस लढविणार आहे. जत तालुक्यात सहा गट व १४ गण, मिरज तालुक्यात सात गट व १२ गण, तर कवठेमहांकाळ, वाळवा, खानापूर आणि तासगाव तालुक्यांत प्रत्येकी एक जिल्हा परिषद गट काँग्रेसकडून लढविण्यात येणार आहे. कवठेमहांकाळमध्ये पंचायत समितीचे तीन, वाळव्यात दोन आणि खानापूरमध्ये दोन गणांमध्ये काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत.

कडेगाव तालुक्यात मोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश कदम (हिंगणगाव बु.) आणि दिग्विजय कदम (चिंचणी) हे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत. तर कुंडल जिल्हा परिषद गटातून डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे चिरंजीव ऋषिकेश लाड निवडणूक मैदानात उतरले आहेत.

काँग्रेसकडून जिल्हा परिषद गटांसाठी दिनकर पाटील (भोसे, ता. मिरज), प्राजक्ता चौगुले (आरग), अक्षदा सूर्यवंशी (बेडग), प्रेरणा पोळ (कवलापूर), पूजा एडके (बुधगाव), प्रशांत अवधूत (कसबे डिग्रज), दस्तगीर कासीम मुजावर (समडोळी), विठ्ठल सातपुते (उमदी, ता. जत), रमेश पाटील (मुचंडी), रवींद्र सावंत (बनाळी), परशुराम सांगोलकर (शेगाव), काजल दुधाळ (डफाळापूर), सुजाता चौखंडे-माळी (बिळूर), ऋषिकेश लाड (कुंडल, ता. पलूस), वर्षा जाधव (दुधोंडी), सुदीप गडदे (अंकलखोप), प्रतीक पाटील (भिलवडी), वैशाली मुळीक (तडसर, ता. कडेगाव), विद्या कुंभार (कडेपूर), प्रियांका महाडिक (वांगी), आशा गावडे (देवराष्ट्रे), अजित बनसोडे (रांजणी, ता. कवठेमहांकाळ), जयश्री पाटील (बोरगाव, ता. वाळवा), अमित पाटील (येळावी, ता. तासगाव) आणि संभाजी धनवडे (भाळवणी, ता. खानापूर) हे उमेदवार रिंगणात आहेत.

पंचायत समिती गणांसाठी मिरज तालुक्यातून गजानन माळी (सोनी), महावीर बस्तवडे (भोसे), वीणाताई पाटील (खटाव), अण्णासो कवाळे (आरग), तन्वी कमलेकर (नरवाड), संभाजी पाटील (बेडग), विजय पाटील (बामणोली), जयश्री खाडे (कवलापूर), शोभा मोहिते (समडोळी), सूरज मगदूम (इनामधामनी), मंजूषा घाडगे (माधवनगर) आणि अनिल डुबल (बुधगाव) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जत तालुक्यातून शालनबाई कोरे (माडग्याळ), संगीता सावंत (उमदी), राघवेंद्र होनमोरे (करजगी), लक्ष्मण चव्हाण (दरीबडची), अश्विनी मोरे (मुचंडी), भाग्यश्री पवार (खोजनवाडी), प्रमोद सावंत (बनाळी), मधुकर नरळे (येळवी), साहेबराव शिंदे (शेगाव), दीपाली चव्हाण (कोसारी), बाबासाहेब माळी (डफळापूर), सारिका गडदे (बाज), बापीरज घेज्जी (बिळूर) आणि श्रीदेवी कट्टीमनी (उमराणी) हे उमेदवार आहेत. पलूस तालुक्यातून हेमलता पवार (कुंडल), सुवर्णा संकपाळ (बांबवडे), प्रशांत नलवडे (रामनंदनगर), जगन्नाथ मोटे (दुधोंडी), वैभव उगळे (आमणापूर), जितेश बनसोडे (अंकलखोप), हजराबी सलामत (भिलवडी) आणि शोभा हजारे (वसगडे) यांना संधी देण्यात आली आहे. कडेगाव तालुक्यातून रणजित पवार (तडसर), सुप्रिया करांडे (शाळगाव), डॉ. जितेश कदम (हिंगणगाव बु.), सुवर्णा रूपनूर (कडेपूर), डॉ. विजय महाडिक (नेवरी), राजकुंवर सूर्यवंशी (वांगी), भारती मिसाळ (देवराष्ट्रे) आणि दिग्विजय कदम (चिंचणी) हे उमेदवार आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातून रावसाहेब शिंदे (नागज), अविराजे शिंदे (मळणगाव) आणि दिगंबर लोंढे (हिंगणगाव) हे उमेदवार रिंगणात आहेत. वाळवा तालुक्यातून यदुराज थोरात (बोरगाव) आणि प्रियांका सावंत (ताकारी) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातून लालासो हरुगडे (आळसंद) आणि चंद्रकांत चव्हाण (भाळवणी) हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

जिल्ह्यात काँग्रेसने मर्यादित पण रणनीतीपूर्ण गट-गणांवर लक्ष केंद्रित करत मित्रपक्षांशी समन्वय साधत निवडणूक रणनिती आखल्याचे चित्र उमेदवारी यादीतून स्पष्ट झाले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here