जत तालुक्यात भाजपाला मोठे यश ; जिल्हा परिषदेत ९ पैकी ८ जागांवर विजय, पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता

0
3


जत : जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने (भाजपा) दणदणीत यश मिळवत आपले वर्चस्व अधिक भक्कम केले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जिल्हा परिषदेतील ९ पैकी तब्बल ८ गटांवर विजय मिळवला, तर पंचायत समितीच्या १८ जागांपैकी १२ जागा जिंकत निर्विवाद सत्ता स्थापन केली. या निकालांमुळे जत तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.


या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी संयुक्त आघाडी उभारून भाजपाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारांनी भाजपावर ठाम विश्वास दाखवत विरोधकांची आघाडी निष्प्रभ ठरवली. जिल्हा परिषदेत काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून जाडर–बोबलाद गटात सावित्री रवी तमन्नगोडा पाटील यांनी विजय मिळवत एकमेव यश नोंदवले.


पंचायत समितीच्या निकालातही भाजपाचे वर्चस्व दिसून आले. भाजपाने १२ जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला २ आणि काँग्रेसला ४ जागांवर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयानंतर जत नगरपालिकेवर सत्ता आणि आता पंचायत समितीवरही एकहाती सत्ता मिळवून भाजपाने ‘हॅट्ट्रिक’ साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शहर व ग्रामीण भागात फटाके फोडून, मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. दुसरीकडे, सर्व शक्ती एकवटूनही अपेक्षित यश न मिळाल्याने विरोधकांच्या गोटात निराशा पसरली आहे. विकासकामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि संघटनात्मक बांधणी याचा फायदा भाजपाला झाल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.


जिल्हा परिषद गटनिहाय विजयी उमेदवार :
शेगाव – शिवाजी खिलारे (भाजप)
मुचंडी – रमेश देवर्षी (भाजप)
बनाळी – सुनील पवार (भाजप)
डफळापुर – स्वप्नाली मासाळ (भाजप)
बिरुळ – शिल्पा जीवनावर (भाजप)
उमदी – याळगोडा तोरणे (भाजप)
संख – कविता पाटील (भाजप)
दरीबडची – सरदार पाटील (भाजप)
जाडर–बोबलाद – सावित्री रवी तमन्नगोडा पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)


पंचायत समितीचे विजयी उमेदवार :
कल्पना अंकलगी, शालन ताई कोरे (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
संगीता सावंत, लक्ष्मण चव्हाण, प्रमोद सावंत, बसवराज घेज्जी (काँग्रेस)
उत्तमराव कट्टीमनी, सदाशिव दर्गाकर, रवीकुमार बगली, नकुसा शेंडगे, सुनिता बेडगे, विना बिराजदार, विजय रुपनर, सचिन बोराडे, अर्चना पाटील, महेश गावडे, मनीषा दुधाळ, मीनाक्षी अभंगे (भाजप)


या निकालांमुळे जत तालुक्यात भाजपाचे राजकीय वर्चस्व अधोरेखित झाले असून, आगामी काळात विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान नव्या सत्ताधाऱ्यांसमोर असणार आहे.

जत तालुक्यातील विजयी उमेदवार मिळालेली मते.

जि. प. गट

सौ. सावित्री रवी (राष्ट्रवादी अजित पवार गट) : ११५४८
यलगोंडा तोरणे (भाजप) : ९९०६
कविता पाटील (भाजप): ८२३७
सरदार पाटील (भाजप) : ७६६६
रमेश देवर्षी (भाजप) : ११०६०
सुनील पवार (भाजप): ९५८२
डॉ शिवाजी खिलारे (भाजप): १२०७३
सौ स्वप्नाली मासाळ (भाजप) : १२१५९
सौ. शिल्पा जीवनावर (भाजप) ९९८४

पंचायत समिती मते

कल्पना अंकलगी (राष्ट्रवादी):६३५७
शालन ताई कोरे (राष्ट्रवादी): ४८३३
संगीता सावंत (काँग्रेस): ४९३९
उत्तमराव कट्टीमनी (भाजप): ४७६०
सदाशिव दर्गाकर (भाजप) : ३५२९
रवीकुमार बगली (भाजपा): ४६६८
लक्ष्मण चव्हाण (काँग्रेस): ३८६८
नकुसा शेंडगे (भाजपा): ४७५३
सुनिता बेडगे (भाजप): ५४६९
विना बिराजदार (भाजप): ५१३५
प्रमोद सावंत (काँग्रेस): ४४२४
विजय रुपनर (भाजप): ४४५८
सचिन बोराडे (भाजप): ४५८२
अर्चना पाटील (भाजप): ६८०८
महेश गावडे (भाजप): ५९१५
मनीषा दुधाळ (भाजप): ६२६७
बसवराज घेज्जी (काँग्रेस): ४८०२
मीनाक्षी अभंगे (भाजप): ४७४५

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here