जत,प्रतिनिधी:स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे जत तालुक्यातील अनेक ठिकाणी जुगार जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. कारण पोलिसांच्या विशेष भरारी पथकाने गेल्या वर्षभरात सुमारे अठराशे जणांवर कारवाई करुन सुमारे काही लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात रोख रक्कमही मोठ्या प्रमाणात जप्त केली आहे. आताही जत तालुक्यातील अनेक गावात पंचमीच्या धर्तीवर
मोठेे तिन पानी डाव रंगणार आहेत. ते पाच ते वीस लाखापर्यत मोठे होऊ शकतात.यापुर्वी सांगलीतील पथकाने पुर्व भागातील दोन गावात छापा टाकून आतररांज्य जूगार अट्टा उद्ववस्त केला होता. त्यामुळे उमदी पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंदे किती बिनधास्तपणे सुरू यांचे उदाहरण समोर आले होते. जूगार खेळणारे मोठे प्रस्थ असणाऱ्या या छाप्यात पकडले होते. त्यांच्या किंमती चारचाकी गाड्या जप्त केल्या होत्या. जत तालुक्यातील अनेक असे अड्डे आजही राजरोसपणे सुरू आहेत. त्याला कुणाचा सहयोग आहे हे स्वंतत्र सांगण्याची गरज नाही. पंचमीच्या पाश्वभूमीवर हा हे जूगार अट्टे मोठ्या प्रमाणात चालणार असल्याची चर्चा सुरू आहे. अवैध व्यवसाय सुरू राहणार नाहीत. सुरू असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे सक्त आदेश पोलिस अधीक्षक दतात्रय शिंदे यांनी सर्व संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकार्यांना दिले आहेत. तरीही ठिकठिकाणी जुगार अड्डे सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पोलिसांच्या विशेष पथकाकडून असे जुगार अड्डे उद्ध्वस्त केले जात आहेत. त्यांच्या दररोज ठीक-ठिकाणी कारवाया सुरू आहेत. मात्र या जुगार अड्ड्यांकडे काही अपवाद वगळता बहुसंख्य स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.