जतला अखेर तहसीलदार मिळाले | जीवन बनसोडे यांचे नियुक्ती आदेश ; संखला प्रतिक्षा,जोंगेद्र कट्यारे नवे प्रांत

0
26

जत,संकेत टाइम्स : जत तहसील कार्यालयाला अखेर तहसीलदार मिळाला असून संख येथे नियुक्ती आदेश झालेले जीवन बनसोडे यांची नियुक्ती अंशत: बदल करून त्यांचे जत तहसील येथे नियुक्ती आदेश महसूल विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या सव्वा महिन्यापासून रिक्त पदावर तहसीलदार बनसोडे‌ जत तहसील सोमवारी कार्यभार स्विकारण्याची शक्यता आहे.दुसरीकडे संख अप्पर तहसील कार्यालयाला अद्याप अप्पर तहसीलदार यांची प्रतिक्षा आहे.प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांचेही बदली आदेश निघाले असून त्यांच्या जागेवर रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोंगेद्र कट्यारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जतचे‌ तहसीलदार सचिन पाटील यांची ६ ऑगष्ट २०२१ रोजी बदली झाली होती.तेव्हापासून जत तहसीलदार पद रिक्त होते तर पावनेतीन महिन्यापुर्वी संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे हे लाचलुचपत विभागाच्या कारवाईत पकडल्यापासून हेही पद रिक्त आहे.
रिक्त पदामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष कॉग्रेस व विरोधी पक्ष भाजपात जोरदार सोशल वॉर सुरू होते.भाजपाकडून बोंबाबोब आंदोलनही करण्यात आले होते.
आरोपपत्यारोप झाले होते.अनेक चर्चांना उधान आले होते.अखेर सव्वा महिन्यानंतर जतला जीवन बनसोडे यांची नियुक्ती झाल्याचे आदेश महसूल विभागाकडून काढण्यात आल्याने रिक्त जत‌ तहसीलच्या‌ तहसीलदार पदाचा दुष्काळ संपणार आहे.
दुसरीकडे संख अप्पर तहसील कार्यालयाला अद्याप अप्पर तहसीलदारांची प्रतिक्षा कायम आहे.
प्रांत प्रंशात आवटे यांची बदली
जतचे विभागीय अधिकारी तथा प्रांत प्रंशात आवटे यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागेवर रामटेकचे विभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची नियुक्ती झाल्याचे शासन आदेश निघाला आहे.आता कट्यारे कधी पदभार स्विकारतात,याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बदली आदेशावर सोशल मिडिया वॉर
जतचे तहसीलदार म्हणून जीवन बनसोडे यांच्या नियुक्ती अंशत:बदल झालेले आदेशाचे पत्र सोशल मिडियावर पडताच कॉग्रेस व भाजपाकडून पुन्हा वॉटस्अप वॉर सुरू झाले होते.भाजपाकडून आमच्या आंदोलनामुळे तहसीलदार नियुक्ती झाले असून पै-पाऊण्याचे राजकारण संपुष्टात आणल्याचे मँसेज शेअर करण्यात येत होते.तर कॉग्रेसकडून भाजपा सरकार काळात कमिशन हप्तेबाजीला बळ मिळाले होते.तर शासनाच्या आदेशानुसारच नियुक्ती आदेश निघालेचे मांडण्यात आले.दिवसभर मात्र अनेक वॉटस्अप गुपवर झालेल्या चर्चेने अन्य‌ जणाचे चांगलेच मनोरंजन झाले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here