जत तालुक्यातील जत शहर,उमदी,संख येथे मुख्य चौकामध्ये अनेक ठिकाणी मटका हा अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असून,मटक्यासारख्या अवैध व्यवसायांना वेळीच आळा न घातल्यास अनेक तरूणांचे प्रपंच देशोधडीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा पोलीस प्रमुखांनी तात्काळ याची गांभीर्याने दखल घेऊन, अवैध व्यवसायांना पायबंद घालून सर्वसामान्य नागरिकांचे प्रपंच उध्वस्त होण्यापासून वाचवावेत अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जत तालुक्यातील जत,संख,उमदी या तिन्ही गावात अवैध धंद्याचा दिवसेंदिवस वाढत असलेला कल पाहता,या गावांना अवैध धंद्याच्या बाबतीत एक वेगळीच प्रसिद्धी मिळत असल्याचे दिसून येत आहे.या गावाच्या आसपासच्या गावे व वाड्यावस्त्यावर सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे शेतमजूर व इतर कामधंदा करुन आपला उदरनिर्वाह करतात.जत,संख,उमदी ही गावे अनेक वाड्या वस्त्यांना व गावांना जोडले असल्यामुळे अनेक गावातून लोक अवैध धंदे करण्यासाठी एकमेव या गावांना पसंती देत आहेत.
बस स्थानक चौकात असणारे दुकान गाळे , पानटपऱ्या अवैध धंदे करणाऱ्या लोकांना भाडेतत्त्वावर देऊन गावातीलच काही लोक अवैध धंदे करणाऱ्यांना मदत करीत असल्याची चर्चा महिला वर्गासह गावातील लोक करीत आहेत. या तिन्ही गावात मटका सुरू असलेल्या चौकात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. याच चौकात काही दवाखाने व मेडिकल आहेत. संपूर्ण गावातील व परिसरातील लोक दवाखान्यासाठी व मेडिकलसाठी याच ठिकाणी येत असतात. प्रवासाला व बाजारहाट करण्यासाठी जाणारा महिलावर्ग , शाळा,कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या परिसरातून जाताना मटका खेळण्यासाठी आलेल्या लोकांच्या घोळक्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.
अनेक तरूणांनी मेहनत न करता केवळ मटका खेळून कमी वेळेत जास्त पैसे कमविण्याच्या नादात आपले प्रपंच देशोधडीला लावले आहेत.
मुख्य चौकात जसजसे धंदे वाढतील तसतसे अनेक तरूण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत.यामुळे अनेक जण कंगाल तर काही जण कर्जबाजारी झाले आहेत.या तरूणांचे प्रपंच व आयुष्य सुरळीत करण्यासाठी , अवैध धंद्यामुळे गावाची होत असलेली बदनामी थांबविण्यासाठी व तरुण पिढीचा भविष्याचा गांभीर्याने विचार करून जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी बेंबदपणे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांना आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.