जत,संकेत टाइम्स : जत येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिस्थापन करणे संदर्भात ना हरकत दाखले साठी बांधकाम भवन मुंबई येथे वरिष्ठ वास्तू विशारद श्रीमती माथोणकर मॅडम यांचेकडे जिल्हा बँक संचालक तथा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान जतचे उपाध्यक्ष प्रकाशराव जमदाडे यांनी प्रस्ताव सादर केला.यावेळी सांगली जिल्हा ऑडिटर संघटनेचे अध्यक्ष सतीश भोसले साहेब उपस्थित होते.
प्रकाश जमदाडे म्हणाले,या कार्यालयाकडून 15 दिवसात ना हरकत दाखला मिळेल अशी आशा आहे,हा अंतिम ना हरकत दाखला असून यानंतर जिल्हाधिकारी सांगली हे अंतिम मंजूरी देतील व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जत शहरातील छत्रपती शिवाजी चौकात विराजमान होईल.
जत तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची इच्छा पूर्ण होईल यासाठी मी, खा संजयकाका पाटील व माजी आमदार तथा समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांचे मार्गदशनखाली प्रयत्नशील आहे,असेही यावेळी जमदाडे म्हणाले.