सांगली : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी दिनांक 29 जून 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा रोजगार मेळावा प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, गणपती कॅन्सर हॉस्पीटल समोर, मिरज येथे होणार असून याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
हा रोजगार मेळावा हा ऑफलाईन / ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आपआपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे Web : https://mahaswayam.gov.in या संकेत स्थळाव्दारे लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा. तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करावी.
सांगली जिल्ह्यायातील औद्योगिक क्षेत्रामधील व सेवा क्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रामधील नामवंत उद्योजकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असणारी विविध रिक्तपदे https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुपरक्रॉफ्ट फौंड्री प्रा.लि.मिरज, नेहा इंजिटेक प्रा.लि., युरेका फोब्ज प्रा.लि., मिलेनियम मोटर्स, इस्टीम ॲपीनरियल सर्व्हीस प्रा.लि. अल्फा फौंन्ड्रीज प्रा.लि. मिरज एपीक यार्न प्रा.लि.इस्लामपूर व पुणे येथील टालेन्टेन्सू सर्व्हीस प्रा.लि., बीएसए कार्पोरेशन लि इ. नामवंत कंपन्यानी एकूण 1 हजार 65 रिक्तपदे अधिसूचित केलेली असून यामध्ये प्रामख्याने इ. 10 वी 12 वी पदवीधर, पदव्यूत्तर पदवी आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिग पदवी तसेच मेकॅनिकल इंजिनिअर्स/डिप्लोमा मेकॅनिक/ आयटीआय-डिझेल मेकॅनिक/ आयटीआय-फिटर्स/ आयटीआयवेल्डर्स/ कॅज्युअल्स वर्कस/ मेल्टींग ऑपरेटर/ हेल्पर्स/ सुपरवायझर/ व्हीएमसी/ सीएमसी ऑपरेटर/ वर्कर्स/सर्व्हिस ॲडवायझर/ सुपरवायझर/ मेकॅलिक /स्पेअरपार्ट असीस्टंट/ ऑफिस बॉय/पेंटर (टू व्हिलर)/ स्ट्रेचिंग मशिन ऑपरेटर / ॲसेब्ली लाईन ऑपरेटर/ ॲप्रेटिशिप व्दारे 1 हजार 65 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आलेली आहेत.
जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी या मेळाव्यात भाग घ्यावा. या बाबत काही अडचण असेल तर दुरध्वनी क्रं.0233-2990333 वर किंवा E-mail-sanglirojgar@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.