संख सोसायटीच्या चेअरमनपदी ईराप्पा कन्नुरे आमगोंडा

0
13
व्हा.चेअरमन आमगोंडा बिरादार
संख,संकेत टाइम्स : संख विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ईराप्पा कन्नुरे,तर व्हा.चेअरमनपदी आमगोंडा बिरादार यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी प्रणित माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांच्या नेतृत्व खाली श्री.लायव्वादेवी शेतकरी विकास परिवर्तन पँनेलने १३ पैकी १३ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविली आहे.

 

 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चेतन जावीर,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी फतुसाहेब शेख यांनी काम पाहिले. यावेळी सचिव मलगोंडा बिरादार उपस्थित होते.
सुभाषचंद्र बसवराज पाटील ,रावसो विठ्ठल कोट्याळ,मैनूद्दीन बादशहा जमादार,गणपती बसवंत बिराजदार,रामगोंडा लक्ष्मण बिराजदार,ज्ञानेश्वर विठ्ठल बिरादार,यल्लाप्पा लालू बिराजदार,रेणुका शिवाप्पा कनमडी,पार्वती रामगोंडा जामगोंड,गुरुबसू दादू कदम,शिवय्या बसय्या जंगम हे संचालकपदी निवडून आले आहेत.

 

यावेळी नुतन चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील,युवा नेते सुभाष पाटील, साहेबराव टोणे, आय.एम बिरादार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दयगोंडा बिरादार,माजी सरपंच तुकाराम बिरादार, मैनुद्दीन जमादार, राजेंद्र हलकुडे,भाऊराय बिरादार,माजी सरपंच सिदनिंगय्या जंगम,माजी प्रा.रामगोंडा फुटाणे सर,पोलीस पाटील सुरेश पाटील, कुमार पाटील, रमेश कनमडी यांच्या सह सर्व ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.
संख : संख सोसायटीच्या चेअरमन ईराप्पा कन्नुरे आमगोंडा,व्हा.चेअरमनपदी आमगोंडा बिरादार यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here