डफळापूर,संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे जत-सांगली रस्त्याकडेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मात्र, चोरट्यांचा हा प्रयत्न असफल झाला.चोरट्यांनी एटीएम इमारती बाहेर काढले मात्र तेथून ते मशीन नेहू शकले नाहीत.शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी,जत-सांगली रोड वर बाज रस्त्यानजिक डफळापूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम मशिन आहे. काल, शुक्रवारी सायंकाळी संबंधित कर्मचाऱ्यांनी या मशीनमध्ये पैशांचा भरणा केला होता. अन् आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी हे मशीन फोडण्याच प्रयत्न केला.शनिवारी झालेला पाऊस व विजेचा लंपडाव होत होता.दरम्यान यांचा फायदा घेत कारमधून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एटीएमच्या खोलीत प्रवेश केला व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोडतोड केली.
तर एटीएम मशीन दोरीच्या सहाय्याने कारला बांधून पळवण्याचा प्रयत्न केला.मशीन कसेबसे इमारती बाहेर काढले.मात्र, मशीनच फोडता न आल्याने चोरटे रिकाम्या हाताने पसार झाले. ही घटना नजीकच्या बझार मधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. आज, सकाळी ही घटना नागरिकांच्या निदर्शनास आली. जत पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करुन पंचनामा केला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत दरम्यान श्वान पथक व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिली.