मायदेशी येताच सांगलीत करणार जंगी स्वागत
– जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली : इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकविणाऱ्या सांगलीच्या संकेत महादेव सरगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्हा प्रशासनातर्फे हार्दिक अभिनंदन केले. सर्व सांगली जिल्हावासियांसाठी तसेच महाराष्ट्र आणि भारतासाठी संकेतचा विजय संकेत सरगरचे यश ही गर्वाची बाब आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे, असे सांगून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संकेतने मिळविलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संकेतचे वडील महादेव सरगर आणि प्रशिक्षक श्री. मयूर सिंहासने यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून अभिनंदन केले .
यावेळी त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये रजत पदकावर नाव करणाऱ्या संकेतचे मायदेशी आगमन होताच सांगलीत जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात येईल असेही सांगितले.