भारतविरोधी कारवाई,पुन्हा हे 8 युट्यूब चँनेल केले बँन

0
5
भारतविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत केंद्र सरकारने आज आठ युट्यूब चॅनेल बंद केले आहे. यामध्ये सात भारतीय तर एका पाकिस्तानी युट्यूब चॅनलचा समावेश आहे. तसेच एक फेसबुक खाते आणि दोन फेसबुक पोस्टही केंद्र सरकारकडून बंद करण्यात आले आहे. बंद केलेल्या खात्यांना एकूण ११४ कोटी व्हूज असून त्यांचे ८५ लाख सबस्क्रायबर्स आहेत.

 

 

“ब्लॉक केलेल्या युट्यूब चॅनेलमध्ये लोकतंत्र टीव्ही, U&V टीव्ही, एएम रझवी, गौरवशाली पवन मिथिलांचल, सरकारी अपडेट आणि सबकुछ आणि देखो, यांचा समावेश आहे. तर पाकिस्तानचे न्यूज की दुनिया हे चॅनलही बंद करण्यात आले आहे.

 

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व युट्यूब चॅनल भारतात धार्मिक द्वेष परवण्याचे काम करत होते. तसेच खोटी आणि भारतविरोधी माहितीही या चॅनलद्वारे पसरवल्या जात होती. यामुळे देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता होती, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.

 

 

डिसेंबर २०२१ पासून सरकारने आतापर्यंत १०२ युट्यूब चॅनेल आणि इतर अनेक सोशल मीडिया खाती ब्लॉक करण्याचे निर्देश जारी केले आहेत.”

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here