सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये शै.वर्ष २०१९-२० पासून नव्याने सुरु करण्यात आलेल्या डी.फार्म व पीजी-डीएमएलटी या विद्या शाखेची महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई (एमएसबीटीई) यांच्या निरीक्षण पथकाने महाविद्यालयास भेट देऊन त्याठिकाणी असणाऱ्या सोयी-सुविधा यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर,क्लासरूम,अद्यावत लॅब,लायब्ररी,स्टाफ तसेच विद्यार्थ्यांशी सुसंवाद या सर्व बाबींची पडताळणी करून महाविद्यालयास ‘व्हेरी गुड’ हा दर्जा देण्यात आला असल्याचे कॅम्पस डायरेक्टर मा.श्री. संजय अदाटे यांनी सांगितले.
संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर अमित रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक दिनेश रुपनर यांनी विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
एमएसबीटीई मार्फत सदर मूल्यांकनाकरिता एका निरीक्षण पथकाची स्थापना करण्यात येते. सदर निरीक्षण पथक संस्थेमध्ये येऊन विविध शैक्षणिक व इतर बाबींची तपासणी करतात. यामध्ये पात्रताधारक प्राचार्य, अनुभवी उच्च शिक्षित प्राध्यापक वृंद, मागील ३ वर्षाचा निकाल, प्लेसमेंट, हॉस्पिटल भेट, इंडस्ट्रियल भेट, गेस्ट लेक्चर्स, सेमिनार, अभ्यासक्रम व अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उपक्रम या बाबी महत्वाच्या असतात. याबरोबरच होस्टेल सुविधा, बस सुविधा, कॅन्टीन, एटीएम सुविधा, आरओ वॉटर सुविधा इत्यादी महत्वाच्या बाबींची पडताळणी करण्यात येते. या सर्व आवश्यक बाबी कॉलेजमध्ये असल्यामुळे नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल विशेषतःजिल्हा व जिल्ह्याबाहेरून हा फॅबटेक कॉलेजकडे वाढला आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय बैस यांनी सांगितले.
महाविद्यालयास ‘व्हेरी गुड’ हा दर्जा मिळाल्याने प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.