सांगली,संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अक्कळवाडी, अंकलगी, बालगाव,बेळोडंगी, बोर्गी बुद्रुक,कानगरी,करजगी, कानबगी, माणिकनाळ, मोरबगी या दहा गावात कन्नड प्राथमिक शाळा आहेत,परंतु मराठी प्राथमिक शाळा नाहीत.मराठी शाळा नसलेल्या गावे व वाड्यावस्तीची संख्या 88 पर्यंत आहे. खाजगी शिक्षण संस्थाकडून मराठी प्राथमिक शाळेसाठी प्रस्ताव मागितले होते.परंतु ते आज पर्यंत लालफीतीत धुरळा खात पडलेले आहेत.या गावात तातडीने मराठी शाळा सुरू कराव्यात अशा मागणीचे निवेदन मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते व दरारा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिले.मंत्रालयात त्यांचे सचिव व ओएसडी प्रवीण मेंढापुरे यांना हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, जत तालुक्यात म्हणजे महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये मराठी शाळा नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात आले.सातत्याने येथे मराठी शाळा सुरू कराव्यात अशी मागणी आहे.शिक्षणांच्या दृष्टीने येथे मराठी शाळा असणे नितांत गरज आहे.खाजगी संस्थानी मराठी शाळा काढण्याचे प्रस्ताव यापुर्वी दिले आहेत. त्यांना मंजूरी देऊन तातडीने शाळा सुरू कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जतेत तातडीने मराठी शाळा सुरू कराव्यात या मागणीचे निवेदन शिक्षण विभागाचे सचिव तथा ओएसडी प्रवीण मेंढापुरे यांना देताना संतोष पाटील