कोरोना काळात औषध विक्रेते बनले देवदूत | – तुकाराम बाबा

0
3

जत,संकेत टाइम्स : कोरोना लॉकडाउनच्या काळात औषधे विक्रेत्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत रुग्णाची सेवा करत देवदूत बनले,त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवले हे विसरून चालणार नसल्याचे प्रतिपादन संत बाबडेबाब मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.

 

जत येथे सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील आठही तालुक्याने सहभाग नोंदविला होता. यंदाचा चषक खानापूरने पटकाविला तर जत संघाला उपविजेतेपद मिळाले. वाळव्याचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या स्पर्धेतील महाविजेते, उपविजेत्या संघाला चषक, मेडल देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत तिसऱ्या आलेल्या संघाला तसेच मॅन ऑफ मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर यांनाही सन्मानित करण्यात आले.

 

हभप तुकाराम बाबा महाराज, सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी  भरत सावंत,अनिल देशमुखे,श्रीकांत गायकवाड,दीपक मगदूम ,सचिन शकळे, स्पोर्ट्स को.चेअरमन प्रकाश मगदूम, साग र साठे,माजी जिल्हाध्यक्ष सुरेश संख,सुरेश पट्टनशेट्टी, तालुका अध्यक्ष भगवान पवार, संचालक सुनील घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here