सायकलचा वापर करायलाच हवा.!

0
3
आजच्या आधुनिक काळात  सायकलचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.संपुर्ण देशात प्रदुषणा सारखी  महाभयानक समस्या उद्भवत चालली आहे.दैंनदीन जीवनात सर्वत्र तीन चाकी , चारचाकी, दुचाकी वाहनांचा सर्रासपणे वापर होताना दिसत आहे.सायकलकडे कोणी फिरकताना दिसत नाही.ही शोकांतिका आहे.स्वयंचलीत वाहनांमुळे दिवसेंदिवस प्रदुषणात भर पडत चालली आहे ‌‌.करोडो रुपयांचे पेट्रोल जाळुन आपण अनेक आजारांना आपण प्रदुषणाद्वारे एक प्रकारे निमंत्रणच देत आहेत.अशा स्वयंचलीत वाहनांमुळे माणसे दिवसेंदिवस आळशी बनत चालली आहेत.त्यामुळे माणसांचे शरीर रोगांचे माहेरघर बनत चालले आहे.

 

 

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातात भर पडुन देशाची प्राणहानी तसेच वित्तहानी देखिल होत आहे.ऐक  काळी सायकल सर्वसामान्यांचे वाहन मानले जात होते.सायकल चालवणे हे भुषणावह मानले जायचे.परंतु आज सायकल चालवयाचे म्हटले की कंटाळा येतो . लोकांना कमी श्रमात पटकन जायचे असते . त्यामुळे सायकल न वापरता दुचाकीचा वापर वाढला आहे.लांबचा प्रवास असल्यास दुचाकी ठिक आहे. पण गावातल्या गावात सायकल वापरलीच पाहिजे.सायकल चालवल्याने हवेचे प्रदुषण होणार नाही.त्याचबरोबर पेट्रोलचा  खर्च वाचेल.सायकल चालवल्याने व्यायाम होईल.माणसाचे आरोग्य देखील चांगले तंदुरुस्त राहील.अपघाताच्या प्रमाणात घट होण्यास एकप्रकारे मदतच होईल.सायकल हे प्रदुषावरील उत्तम पर्याय ठरू शकतो.खर्चीक वाहनांपेक्षा सायकलवर होणारा देखरेख खर्च कमी येतो.त्यासाठी जास्तीत जास्त सायकलींचा वापर करण्याची गरज आहे.राष्ट्रहिताचा विचार करून सायकलचा वापर करायलाच हवा.
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी,ता.श्रीगोंदा, जिल्हा, अहमदनगर
महाराष्ट्र 
मो.७७२१०४५८४५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here