अक्कळवाडी (ता. जत) येथे मिरवणुकीच्या वादातून दोन गटात झालेल्या जोरदार हाणामारीत १५ जण जखमी झाले.याबाबत उमदी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजता घडली. गेल्या काही दिवसांपासून दोन गटात वाद धुमसत होता. गुरुवारी रात्री गावात मिरवणूक होती. यावेळी दोन्ही गटात पुन्हा वादाला तोंड फुटले आणि तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गट लोखंडी गज, काठ्या, दगड, चाकू अशी हत्यारे घेऊन एकमेकांवर धावून गेले.संशयितांमध्ये सरपंच, उपसरपंचासह दोन्ही गटाच्या ४४ व अनोळखी ७० जणांवर गुन्हा दाखल आहे.
नजीरसाब बंदगीसाब इनामदार यांच्या फिर्यादीवरून सरपंच शिवानंद चन्नाप्पा मलाबादी, उपसरपंच सुनील नागाप्पा शेजाळे, रेवणसिद्ध शिवराया पाटील, श्रीशैल बसाप्पा मलाबादी, विश्वनाथ मलकाप्पा मलाबादी यांच्यासह २५ जण तसेच अन्य ४० अनोळखींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.रविकुमार मलकाप्पा हलसंगी यांच्या फिर्यादीवरुन इस्ताक अली रसूलसाब बालगाव, सद्दाम मकबूल इनामदार, लतीब महेबूब इनामदार, रज्जाक हुसेनसाब बालगाव, पैगंबर मीरासाब बालगाव यांच्यासह १९ जण व अन्य ३० अनोळखींविरोधात उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हाणामारीत नजीरसाब बंदगीसाब इनामदार, लतीफ मेहबूब इनामदार, सद्दाम मकबूल इनामदार, जब्बार मकबूल इनामदार, मेहबूब मोदीनसाब बालगाव, झुलेखा रजाक पटेल, सैनाज शब्बीर मुल्ला, बियामा मेहबूब इनामदार, रविकुमार मलकाप्पा हलसंगी, सुनील सोनगी, अनिल सोनगी, मंजुनाथ मलकाप्पा मलाबादी, श्रीशैल बसगोंड मलाबादी, काशिनाथ बसगोंड मलाबादी, गजानन रमेश मलाबादी हे जखमी झाले. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.