६ संशयित,७ पिस्तूलेसह १७ जिवंत काडतुसे जप्त,पोलीसांचे कोबिंग ऑपरेशन

0
9
सांगली : सांगली पोलिसांनी रविवारी पहाटे सांगली, मिरज शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविले.यात सांगली, मिरज शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एकूण ६ जणांना अटक करण्यात आली.या कारवाईत त्यांच्याकडून 7 पिस्तूल, 17 जिवंत काडतुसे, 228 नशेच्या गोळ्या आणि गांजा असा 9 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आल्‍या आहेत.त्या पार्श्वभूमिवर सांगली पोलीसाकडून हे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे.

हेही वाचा- अक्कळवाडीत मिरवणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी,तब्बल ११४ जणावर गुन्हा दाखल

या ऑपरेशनमध्ये अटक करण्यात आलेल्‍या सहा गुन्हेगारांपैकी चारजण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ, नशेच्या गोळ्या, गांजा बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे.

हेही वाचा-आटपाडीत विवाहित महिलेचा लॉजवर खून

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ येथे महाराष्ट्र पोलिसांकडून तर कागवाड येथे कर्नाटक पोलिसांकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात केला आहे.कागवाड परिसरात निमलष्करी दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्‍या आहेत. महाराष्ट्र- कर्नाटकात ये- जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here