जत : जत शहरातील विविध मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी जत शहराला नवीन पाणी पुरवठा योजना ७१ कोटींची मंजुर झाली पाहिजे.जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयातूनच कामकाज पहावे.
शहरातील प्रत्येक प्रभागात दररोज किमान एक तास पिण्यायोग्य पाणी मिळावे.वाहतूक कोंडीचा योग्य बंदोबस्त करावा.भारती विद्यापीठाच्या वसतिगृहा जवळील रस्त्याचे तीन वर्षात दोन वेळा निविदा काढून त्याच त्याच ठेकेदाराला दिलेल्या कामाचे गौडबंगाल काय याची सखोल चौकशी करावी,अशा मागण्यात करण्यात आल्या आहेत.यावेळी आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.