डफळापूर : डफळापूर येथील राजे विजयसिंह डफळे हायस्कूलची विद्यार्थींनी समिक्षा संदिप पोतदार हिने नवोदय परिक्षेत यश मिळवत पलूस येथील शाळेसाठी पात्र झाली.या यशाबद्दल समिक्षा पोतदार हिचा लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे नेते कॉ.हणमंत कोळी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
डफळापूर येथील सराफ व्यवसायिक संदिप पोतदार यांची समिक्षा कन्या आहे.यावेळी संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी,संदिप पोतदार,अपेक्स अँकडमीच्या संचालक मयुरा पाटील,सौ.अश्विनी पोतदार व विद्यार्थी उपस्थित होते.राजे विजयसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक,अपेक्स अँकडमीचे संचालक मयुरा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.समिक्षा हिच्या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.