सांगली:संत निरंकारी मिशनच्या वतीने बाल संत समागम संपन्न झाला. संत निरंकारी मिशन आध्यात्मिक विचारधारेच्या माध्यमातून विश्वात विश्वबंधुत्व व शांती प्रस्थापीत करण्याचे मानवतेचे कार्य गेली ९४ वर्षे अविरतपणे करीत आहे.युवकांसाठी भविष्य निर्माण करू शकत नाही; परंतु उज्वल भविष्यासाठी सुसंस्कारित व सुजान युवक निश्चित निर्माण करु शकतो.प्रत्येक युवक सुजान व सुसंस्कारित बनण्यासाठी तो युवाअवस्थेत येण्यापूर्वीच त्याच्या बालमनावर योग्य संस्काराचे बीज रुजणे अत्यावश्यक आहे. ही काळाची गरज ओळखून सांगली येथे संत बालसमागमाचे आयोजन केले होते.
प.पु.डॉ.पुरुषोत्तम अरोराजी, हुबळी, कर्नाटक यांना विशेष रुपाने बोलाविण्यात आले होते. बाल समागमास प्रबोधित करताना ते म्हणाले की, बालवयात जसे बालकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तर जशी बालके सदृढ होतात, तसेच बालमनावर अध्यात्मिक विचारधारा रुजवली म्हणजे ती सुसंस्कारित होतात, वैचारिक दृष्ट्या संपन्न होतात.म्हणून त्याना बाल सत्संगला न चुकता पाठवा. बाल सत्संगला येणारी मुले आई-वडील व वडीलधार्यांचा मान राखतात,त्यांचा आदर करतात. जी मुले आई-वडील व वरिष्ठांचा आदर करतात ती मुले पुढे जिवनात निश्चित यशस्वी होतात व समाजात सुजान व आदर्श नागरिक बनून स्वतःसह समाजाचाही सर्वांगीण विकास करतात.
स्वतःचे,आईवडीलांचे,समाजाचे व देशाचे अभिमानास्पद कल्याण करतात. म्हणून बालमनावर सुसंस्कार होणे आज सर्वात महत्वाचे आहे. त्यासाठी आपले बालक बालसत्संगला जोडणे म्हणजे उज्वल भविष्यासी जोडणे होय.आज तोच मानव सुखी व समाधानी आहे की ज्याची मुलं सुजान, सुसंस्कारित आहेत.डॉ.अरोराजी पुढे म्हणाले की, सदगुरु ईश्वररुप आहेत त्यांचे चरणी निष्काम भावनेने सेवा केल्याने मानव जीवन सफल होते.