जत : जत दौऱ्यावर असलेले गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे जत तालुक्यात तांडे विकास योजनेअतर्गंत निधी मिळावा,या मागणीचे लेखी निवेदन माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हा बँक संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी दिले.तत्पुर्वी मंत्री अतुल सावे,माजी आमदार जगताप,प्रकाशराव जमदाडे व भाजपाचे पदाधिकारी यांनी उमदी येथील आश्रम शाळेत विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची जत ग्रामीण रुग्णालयात भेट घेत विचारपुस करून त्यांना तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्याचे आदेश मंत्री सावे यांनी दिले.जगताप यांच्या निवासस्थानी मंत्री सावे यांनी भेट दिली,यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान जत तालुक्यातील उटगी लमाणतांडा,दरिबडची लमाणतांडा,कागनरी लमाणतांडा,धुळकरवाडी लमाणतांडा, उमदी मर्चंड लमाणतांडा,निगडी बुद्रक लमाणतांडा यांना प्रत्येकी ५० लाख याप्रमाणे ३ कोटी रूपये विकास निधी द्यावा,असे पत्र यावेळी मंत्री सावे यांना जत भाजपाकडून देण्यात आले.