मांजर्डे : शेतकऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून संघटित होण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना लुटणारी व्यवस्था तयार झाली आहे लुटणाऱ्या व्यवस्थेला मोडून काढण्यासाठी सज्ज व्हावे. उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे,त्यामुळे ऊसाला पाच हजार रुपये दर मिळवण्यासाठी संघर्ष करणार अशी ग्वाही स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. बेदाण्याबरोबर दूध आणि अंडी शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही खराडे म्हणाले.
तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.याप्रसंगी माजी जि प सभापती कमलताई पाटील,वसंतदादा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संभाजी खराडे,उपसरपंच मोहन पाटील,ग्रा.प.सदस्य सुरेश खराडे, विनायक मोहिते,बजरंग मोहिते,उत्तम मोहिते उपस्थित होते.
<iframe src=”https://drive.google.com/
खराडे म्हणाले,द्राक्ष बेदाणा उत्पादकांची वाइट अवस्था झाली आहे.त्यामुळे आम्ही दोन ते तीन मोर्चे काढले चड्डी मोर्चा बेदाणा मोफत वाटप केला.त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलाविले.त्यावेळी त्यांना द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्याची वस्तुस्थिती सांगितली त्यामुळेच बेदाणा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय घेतला,हे स्वाभिमानीच्या लढ्याचे यश आहे.यामुळे राज्यातील एक कोटी विद्यार्थ्याना बेदाणा मिळणार आहे. हा बेदाणा थेट शेतकऱ्याकडूनच विकत घ्यावा यासाठी प्रयत्न राहणार आहे.यापुढे द्राक्ष बेदाणा खाणे कसे फायदेशीर आहे,हे सांगणारी जाहिरात टीव्हीवर प्रसिद्ध करावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.याशिवाय द्राक्ष बेदाणा महामंडळाची स्थापना करावी, सक्षम द्राक्ष पीक विमा योजना सुरू करावी.यासाठी आमचा आग्रह असणार आहे.त्या लढाईत सहभागी व्हा,असे आवाहनही त्यांनी केले. या निर्णयाचा बेदाणा उत्पादकांना लाभ होणार आहे.दूध आणि अंडी उत्पादकांना न्याय मिळावा म्हणून बेदान्या बरोबर दूध आणि अंड्याचा ही शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी आमचा संघर्ष असणार आहे.
शेतीचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे ऊसाचा सद्याचा दर परवडत नाही,तो पाच हजार झाला पाहिजे,हा आमचा आग्रह आहे.पण तो दर घरात बसून मिळणार नाही.त्यासाठी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी राजकारण गट तट बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.याशिवाय तोडी साठी द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत, वजनातील काटा मारी थांबली पाहिजे उतारा बांधावराच कळाला पाहिजे आदी प्रश्न सोडवायचे आहेत.त्यासाठी तुमची साथ हवी आहे.
यावेळी कमलताई पाटील,संभाजी खराडे, सुरेश खराडे,मोहन पाटील,प्रसाद खराडे, पंढरीनाथ मोहिते,अनिल खराडे यांची भाषणे झाली.सूत्रसंचलन महेश साळुंखे यांनी केले आभार कुमार जाधव यांनी मानले.कार्यक्रमाला लक्ष्मण मंडले,बजरंग मोहिते,किसन मोहिते,पप्पु खराडे,संजय लाड,पांडुरंग खराडे,निलेश खराडे,शंकर जावीर आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.