महिला स्वच्छतागृहासाठी रक्षाबंधनादिवशीच भिकमाग आंदोलन

0
1

पाच वर्षे पाठपुरावा पण, नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

 

जत शहरात एकही स्वतंत्र महिला मुतारी नसल्याने स्वतंत्र महिला मुतारी सुरु करण्यासाठी भाजी विक्रेत्या महिलांकडे भीक मागून युवा नेते विक्रम ढोणे यांनी भिकमाग आंदोलन करून जमा होणारा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे मनीऑर्डर करून पाठविणार असल्याचे सांगितले.गेली पाच वर्षे आम्ही जत शहरात स्वतंत्र महिला मुतारी सुरु करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदन देतो,आंदोलन करतो महीला नगराध्यक्ष आणि 50% महिला प्रतिनिधी असतानाही जत शहरात एकही स्वतंत्र महिला मुतारी सुरू झाली नाही हे समस्त महिला भगिनिंचे दुर्दैव म्हणावे लागेल.आता प्रशासन काळात किमान महिला मुतारी सुरू होतील अशी अपेक्षा होती पण मुतारीची सांगाडे फक्त ठेवण्यात आले आहेत ते अशा ठिकाणी ठेवले आहेत की तिथं कुणीही जाणार नाही तिथे जाण्या येण्याची सोय करून पाण्याची व्यवस्था करून प्रत्यक्षात वापरण्यासाठी सुरु करणे अपेक्षित होते प्रशासकाचे पण दुर्लक्षच सुरू आहे.

जत शहर हे तालुक्याचे ठिकाण असून मोठी बाजारपेठ असल्याने खरेदी विक्रीसाठी ग्रामीण भागातील महिलांची संख्या मोठी असते महिलांसाठी स्वतंत्र मुतारीची सोय नसल्याने महिलांची मोठी गैरसोय होत असून भाजी विक्रेत्या महिला मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे नाईलाजास्तव महिलांना रहदारीच्या ठिकाणी उघडयावर मूत्र विसर्जन करावे लागते त्यामुळे स्वतंत्र महिला मुतारी सुरू करण्यासाठी आंदोलने केल्यावर मुतारीची सांगाडे खरेदी करून वर्ष उलटले तरी अजून महिला मुतारी सुरू केली नसल्याने आज हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येत आहे.

कारण निधी खर्च करूनही महिलांची मुतारी सुरू करण्यास आर्थिक अडचण असेल म्हणून सुरू केल्या नाहीत म्हणून आम्ही आज माता भगिनींच्या सोयीसाठी भीक मागून जिल्हाधिकारी यांच्याकडे मनीऑर्डर करत आहे आणि त्यांनी ते पैसे नगरपालिकेला वर्ग करून स्वतंत्र महिला मुतारी सुरू करण्याचे आदेश देऊन माता भगिनींना रक्षाबंधन भेट द्यावी असे विक्रम ढोणे म्हणाले. आंदोलनात भाजी विक्रेत्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शहनाज मुजावर,रंजना साळे,अंबवा माळी, जयश्री साळे, सुनीता पनाळकर, नंदाबाई बिराजदार, सुनीता जाधव, रत्नाबई कोळी, शांताबाई माळी,कमल माळी, महादेवी माळी कमल शिंदे यांच्यासह शहरातील युवक लकी पवार, प्रशांत एदाळे, तानाजी कटरे , पापा हुजरे,विलास काळे,आकराम सरक, पवार, रामचंद्र मदने आदी उपस्थित होते.

 

भाजी विक्रेत्या महिलांच्या हाती साहेब,दादा आम्ही तुमच्या भगिनी नाही का?

आम्हाला मुतारीची सोय करून रक्षाबंधनाची भेट द्यावी असे बोर्ड महिलांच्या हाती होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here